राज्यभरात पुन्हा एकदा बिबट्याने डोकं काढलंय.बिबट्याचा कहर मीरा भाईंदर, रत्नागिरी आणि पुण्याच्या शिरुरमध्ये पाहायला मिळालाय. मीरा भाईंदरमध्ये सकाळपासून बिबट्याचा कहर पाहयाला मिळालाय.तर दुसरीकडे रत्नागिरी आणि शिरूरमध्येही बिबट्याचा भरवस्तीत वावर पाहायला मिळालाय.मीरा भाईंदरमधील बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश.बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी.तब्बल 7 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश.