माणिकराव कोकाटे यांच्या बाबतचा आज निकाल आला आहे. मात्र या प्रकरणात दोन लोकांची महत्वाची भूमिका होती. ज्यांनी हे प्रकरण सर्वात आधी समोर आणले होते ते तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे म्हणजेच आत्ताच्या याचिकाकर्त्या आणि दुसरे म्हणजे वकील आशुतोष राठोड.. दोघेही पती-पत्नी असून आतापर्यंतच्या या सर्व लढ्यात त्यांनी एकमेकांना खंबीर साथ दिली. आतापर्यंत पती-पत्नीचा लढा इथपर्यंत कसा पोहोचला याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे आमची प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.