सोने चांदीचे भाव किती ही गगनाला भिडलेले असताना शिर्डीच्या साईचरणी सुवर्ण दानात कोणतीच कसर होताना दिसत नाही.. काल साईबाबांना दोन मोठी सोन्याची दान आलीये.. मध्यप्रदेशमधील भाविकांन बाबांना 22 लाखांचा मुकुट अर्पण केलाय.. तर दुबई येथील एका साईभक्ताने साई मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली साधारण 55 लाखांची सुंदर फ्रेम अर्पण केलीये .. भाविक आता सुवर्ण खडकीतून साईचं दर्शन घेताना दिसून येताय.. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी..