बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 डिसेंबरला होणार आहे. घटनेच्या व्हिडिओचे पेन ड्राईव्ह आज कोर्टात आरोपींच्या वकिलांना सुपूर्द करण्यात आलंय. पुढील सुनावणी वेळी दोषारोप निश्चित होण्याची शक्यता आहे. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी घटनेच्या व्हिडिओचे पेन ड्राईव्ह आरोपींच्या वकिलांना सुपूर्द केलंय.