विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीमध्ये राखीव ठेवलेला निकाल हा आज दिला जाईल. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी करत शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या नियुक्तीबाबत सुरू असलेला गोंधळ त्वरित संपवावा अशी मागणी देखील शिवसेनेनं केली होती.