आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मत्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी केलाय. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील मांस विक्रेत्यांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. राणेंच्या या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया येतायत. राणे नवीन बिझनेसमध्ये जातायत त्यांचं अभिनंदन असं आमदार अस्लम शेख म्हणाले.राणेंनी लोकांना दिलेलं वचन बजेटमध्ये दिसत नाही.अर्थसंकल्पावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा पुढे केला जातोय असं शेख म्हणाले तर आमदार रईस शेख यांनीही राणेंना टोला लगावलाय.मल्हार सर्टिफिकेट देणं हे सरकारी धोरण आहे का? असा सवाल रईस शेख यांनी विचारलाय.