Mumbai Drain Cleaning | नालेसफाई.. निमंत्रण आणि धुसफूस...Nalesafai ची पाहणी, महायुतीत नाराजीनाट्य

मुंबईत नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यांवरून भाजप आणि शिंदे गटात कुरघोडी सुरू झालीय.. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण व्हावी, यासाठी महापौर रितू तावडे यांनी नालेसफाईच्या कामाचे पाहणी दौरे सुरू केले. मात्र, शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांना या दौऱ्यांबाबत माहिती न देता हे दौरे केले जात असल्याने वाद निर्माण झालाय. आता महापौरांच्या पाहणी दौऱ्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांनीही नालेसफाई पहाणी दौरे आयोजित केले आहेत. निमंत्रण नसताना पाहणी दौऱ्यांना जाण्याची आमची संस्कृती नाही असं संजय घाडी यांनी म्हटलंय.. तर मे अखेरपर्यंत नालेसफाईचं लक्ष्य असल्यामुळे वेगवेगळी पाहणी केली जात असल्याचं स्पष्टीकरण महापौर रितू तावडेंनी दिलंय..

संबंधित व्हिडीओ