Nagpur Heat| वाढत्या उन्हाचा कहर, दुपारी कोचिंग क्लासेस घेण्यावर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपाययोजना

नागपुरातल्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. दुपारच्या सत्रात कोचिंग क्लासेस घेण्यावर बंदी घालण्यात आलीय. तसंच कामगारांनाही विश्रांती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी 11 ते सायंकाळी 4.30 या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी घालण्यात आलीय. तर कोचिंग क्लासेसचे वर्ग हे सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रातच घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. महाविद्यालयांनी शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा घेणं टाळावं असंही सांगण्यात आलंय. उद्योग कारखाने आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी दुपारी 11 ते 4 या वेळात विश्रांती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ