पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने नाशिकच्या पूर्व भागात खरिपाची पिके पूर्णपणे करपू लागली आहेत. प्रमुख नगदी पीक असलेल्या मक्याची वाढ खुंटली असून कणसांमध्ये दाणेही भरलेले नाहीत. उत्पन्नाची आशा मावळल्याने नांदगाव तालुक्यातील पानेवाडीसह परिसरातील मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर वार्षिक आर्थिक गणिताचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतलीय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी...