Nashik | बिबट्याची दहशत कायम, तीन वर्षीय चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या अद्याप हाती लागेना

नाशिकमध्ये सध्या बिबट्याची मोठी दहशत बघायला मिळते आहे. रोज कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याच्या चर्चा कानी पडत असतानाच वडनेर दुमाला परिसरात रक्षाबंधनच्या पूर्वसंधेलाच तीन वर्षीय आयुष भगत या चिमुकलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेला आता पाच दिवस उलटून गेले आहेत मात्र अजूनही बिबट्या वनविभागाच्या हाती लागलेला नसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान वन विभागाच्या वतीने परिसरात पिंजरे लावण्यात आले आहे, ड्रोन कॅमेरा द्वारे नजर ठेवली जाते आहे, नागरिकांमध्ये प्रत्यक्ष तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते आहे.

संबंधित व्हिडीओ