नाशिकच्या येवला येथील ओंकार धर्मरक्षक ग्रुपने यंदाच्या गणेशोत्सवात गांधी मैदानावर माहूरगडच्या प्रसिद्ध रेणुका देवी मंदिराचा अत्यंत देखणा देखावा उभारला आहे. या देखाव्याच्या ठिकाणी मंडळाकडून सालाबादप्रमाणे या वर्षीही देवीचा जागर व धार्मिक उपक्रम राबवून भाविकांचे लक्ष वेधले जात आहे. अनेक वर्षा पासून मंडळातर्फे नाविन्यपुर्ण देखावे सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.