छत्रपती संभाजीनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पदांसंदर्भात राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेतलाय.समितीच्या 'उपायुक्त तथा सदस्य' या पदाचा अतिरिक्त कार्यभार आता बदलण्यात आलाय.. 09 सप्टेंबर रोजी मंत्रालयातून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आलेत..यापूर्वी 30 सप्टेंबर 2025 नुसार समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात यांच्याकडे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्यपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र, नवीन आदेशानुसार प्रशासकीय कारणास्तव खरात यांच्याकडील हा अतिरिक्त कार्यभार तातडीने समाप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मनोज जरांगे यांनी जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांवर टीका केली होती.