कल्याण-डोंबिवली परिसरात भेसळयुक्त दुधाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील भोईरवाडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला.या कारवाईत तब्बल 500 लिटर संशयित भेसळयुक्त सुटं दूध जप्त करण्यात आले. जप्त केलेले दूध नंतर नष्ट करण्यात आले. सांगलीहून हे दूध आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे दूध कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध डेअरींमध्ये विक्रीसाठी पुरवले जात होते. दूध विक्रेत्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात आढळले. खरेदी-विक्रीची बिलेही सादर करण्यात आली नाहीत.
दूधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. FDAकडून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.