सरकारमधील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांविरोधात आज ठाकरे गट आक्रमक झाला. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली.मंत्री संजय शिरसाट यांच्या रुममध्ये सापडलेली पैशाची बॅग,गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावावर असलेलं सावली डान्सबार, संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये केलेली मारहाण आणि विधानसभेत रम्मी खेळणाऱ्या माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.मुंबईतल्या दादरमध्ये रस्त्त्यावर पत्ते खेळत, पैशांची बॅग दाखवत गळ्यात पत्त्याच्या माळा घालत आंदोलन केलं.. तर नागपूरच्या हिंगणा टी पॉइंट परिसरात आंदोलन करण्यात आले. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 काही काळ कार्यकर्त्यांनी अडवून धरला.तर डोंबिवलीत पत्ते खेळणारा मंत्री, वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री यांची वेशभूषा धारण करून प्रतिकात्मक आंदोलन केलं... संभाजीनगरमध्ये मंत्री योगेश कदम यांच्याबाबत डान्सबारचा नाट्य सादर करण्यात आलं.शिवाय मला लाज वाटते असं आंदोलनाला नाव देण्यात आलं.तिकडे पुण्यात आज ‘महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन’ करत भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली.नाशिकच्या शालिमार येथे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जनआक्रोश मोर्चा काढला.महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.. तिकडे कोल्हापुरात ठाकरे गटानं कोल्हापूर प्रवेशद्वारावर आंदोलन केलं.कार्यकर्त्यांची धरपकड करत आंदोलन शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.बीडमध्ये महायुतीमधील भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं.अण्णाभाऊ साठे चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.