विरोधकांच्या आवाजानं राजधानी दिल्ली आज दुमदुमली..लोकसभा आणि महाराष्ट्र, कर्नाटक विधानसभेत मतांची चोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला होता.आज राहुल गांधींच्या नेतृत्त्वात आज संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चाचं निघाला.. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे संजय राऊतांसह 300 खासदार सहभागी झाले होते.सर्व खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेनं घोषणाबाजी करत निघाले.. दिल्ली पोलिसांनी आंदोलक खासदारांना अडवलं.. यावेळी थोडी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.पोलिसांनी फक्त 30 जणांना आत जाण्याची परवानगी दिली.. पण खासदारांनी ती फेटाळली. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी पोलिसांचे बॅरिगेट्सवर चढून पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतर महिला खासदार आक्रमक झाल्या. महिला बॅरिगेट्सवर चढल्या. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी,प्रियंका गांधी, संजय राऊत यांना ताब्यात घेतलं. सर्व खासदारांना बसमध्ये बसवण्यात आलं.बस संसद भवन मार्ग पोलिस स्टेशनच्या दिशेनं गेली.. आणि खासदारांना पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं.