पंढरपूर तालुक्यातील दोन वृद्धांच्या प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध आणि प्रेम प्रकरण होते. मात्र या दोघांमध्ये वाद झाल्याने मंगल यांनी एका शेतामध्ये अंबादास यांना मारून त्यांचा मृतदेह अर्धवट जाळून टाकला होता. ही घटना साधारण 27 जुलै रोजी घडली. 2 ऑगस्टला मृतदेह समोर आला. यानंतर दीड महिन्यानंतर अंबादास यांच्या दोन्ही मुलींच्या डीएनए तपासणीवरून अंबादास यांची ओळख पटली आहे. यानंतर अवघ्या बारा तासात पोलिसांनी तपास करून मंगल होनमाने यांना अटक करून गुन्ह्याचा तपास पूर्ण केलाय. प्रेम प्रकरण व किरकोळ भांडणावरून 70 वर्षाच्या वृद्धाचामंगल हिने हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
Pandharpur | 70-year-old man murdered over a love affair; incident comes to light after a month and a half.