केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला.. त्यानंतर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय.. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, विद्यमान खात्यांसोबतच प्रल्हाद जोशी आता शिक्षण मंत्रालयाची धुरा देखील सांभाळणार आहेत..