पुण्यातून एक धक्कादायक बातमी पुण्यात शिक्षिकेनं विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार घडलेला आहे. सत्तावीस वर्षीय शिक्षिकेकडून सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर हा अत्याचार झालाय. दरम्यान या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला कोठडी सुनावण्यात आली आहे.