पुण्यातील नामांकीत दीनानाथ रुग्णालयाचा मुजोरपणा समोर आलाय. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला 10 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे अडीच लाख भरा आणि उपचार सुरू करा, अशी विनंती केली.पण तरीही रुग्णालयानं दाखल करून घेतलं नाही आणि यावेळी दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना तनीषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या सगळ्या आरोपांवर दीनानाथ रुग्णालयाचं म्हणणं अद्याप समोर आलेलं नाही.तनीषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत, अमित गोरखे यांनी देखील रुग्णालय प्रशासनावर याप्रकरणी आरोप केलेत.