Pune| Hadapsar मध्ये दुकानात सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग; 4-5 दुकानांचं मोठं नुकसान

पुण्याच्या हडपसरमधील गोंधळे नगर परिसरात भीषण आग लागलीय.कालव्याच्या कडेला असलेल्या दुकानात सिलेंडरचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली.काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत परिसरातील चार ते पाच दुकानांना वेढा घातला.या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.. मात्र स्टेशनरी दुकानासह इतर दुकानांतील फ्रिज, सिलेंडर, शेड आणि मोठ्या प्रमाणातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय..यात लाखोंचं नुकसान झालंय.. या अग्निशामक दलाकडून आता आग विझवण्यात येतीय.अथक प्रयत्नांनंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

संबंधित व्हिडीओ