छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थातच सारथी या संस्थेच्या अनुदान योजनेसाठी खाजगी कोचिंग क्लासेस ने मोठा गैरव्यवहार केल्याचं समोर आलंय. पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासेस ने विद्यार्थ्यांच्या बोगस नोंदी करून शासकीय निधी लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक बेडे यांनी केलाय. या फसवणुकीत सारथीचे अधिकारी देखील सहभागी असल्याचं उघडकीस आलंय.