कोथरुडमध्ये एका पाठोपाठ एक चाळीस पेक्षा अधिक डुकरांचा मृत्यू झालेला होता. डुकरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आलेला आहे. पशुसंवर्धन विभागानं हे सर्व विच्छेदन केलेलं आहे. कोथरूड मधील डुकरांचा मृत्यू कावळीन झाल्याचं आता स्पष्ट झालंय. एका पाठोपाठ एक पुणे शहरातल्या कोथरूड मध्ये मध्यवर्ती ठिकाणी असा डुकरांचे मृत्यू होत असल्यामुळे याबद्दल खळबळ आणि चिंता वाढलेली होती. सूरज कसबे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत. सूरज डुकऱ्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल हा आता समोर आलेला आहे आणि त्याचं कारण सुद्धा पुढे आलेलं आहे. नेमकं या अहवालामध्ये सविस्तर काय म्हंटलं गेलंय? ऋतुजा पुण्याच्या कोथरूड भागामधला जो भारती नगर भिमालय टॉवर जो परिसर आहे त्या टॉवर च्या परिसरामध्ये असलेला एक नाला आहे आणि या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गेल्या आठवड्याभरापासून अनेक डुकरे हे मृतावस्थेमध्ये आढळून येत होते. त्यामुळे या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे पुणे जिल्ह्यामध्ये जेब रुग्णांची संख्या वाढते तर दुसरीकडे हे नवं संकट ओढवलं होतं.