मनसेमध्ये फेरबदल केले जाणार आहेत, संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले जाणार आहेत अशी माहिती मिळते. पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल केले जाणार असून पक्षाची आचार संहिता ही सुद्धा ठरवली जातेय. फेब्रुवारी मध्ये पक्ष अंतर्गत बैठका घेऊन या सगळ्या संदर्भातला निर्णय हा घेतला जाणार आहे तसंच येत्या नऊ मार्च पर्यंत पक्षाचे फेरबदल हे अपेक्षित आहेत. या संदर्भात वरळी मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः संकेत दिलेले होते. देवेंद्र कोल्हटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील. देवेंद्र खर तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःच संकेत दिलेले होते आणि त्यानुसार आता मनसेमध्ये काही मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. नेमकी कशी रणनीती आखली जाते आहे.