Rahul Gandhi यांनी PM Narendra Modi यांना लिहिलं पत्र, पत्रातून नेमकी काय केली मागणी? NDTV मराठी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडावे, असे म्हटले आहे. राहुल यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान मोदींच्या दोन जुन्या विधानांचाही उल्लेख केला आहे.जेव्हा पंतप्रधान १९ मे २०२४ रोजी भुवनेश्वर येथे आणि १९ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीनगर येथे झालेल्या रॅलीत जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबत बोलले होते. याशिवाय, राहुल यांनी सरकारला लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी कायदा आणण्याची विनंती केली.

संबंधित व्हिडीओ