शिवसेना फोडून भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार केल्यानं उद्धव ठाकरे नाराज असल्याची सूत्रांनी माहिती दिली.सत्कार कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.राज्याचं राजकारण विचित्र दिशेनं चाललंय असंही राऊत म्हणालेत.कोण कुणाला गुगली टाकतंय, कोण कुणाच्या टोप्या उडवतंय हे समजून घ्यावं लागेल असंही ते म्हणाले.ठाकरे गटानं शरद पवारांनी केलेल्या शिंदेंच्या सत्करावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली.