पोलिसांनी ऋषिराज सावंतचा जबाब नोंदवला.. पोलिसांनी नोंदवलेला जबाब आणि सावंत कुटुंबीयांनी दिलेली प्रतिक्रिया यात मोठी तफावत आहे... ऋषीराज बेपत्ता झाल्याची तक्रार सावंत कुटुंबियांकडून देण्यात आलीए.. तानाजी सावंतांनी यंत्रणा कामाला लावून मुलाचं विमान बँकॉकवरुन थेट चेन्नईला उतरवलं..हा घटनाक्रम समोर असताना काल ऋषीराजच्या मोठ्या भावानं मात्र तो बिजनेससाठी गेल्याचं सांगितलं आणि पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात ऋषीराजनं बँकॉकमध्ये मित्राची सासुरवाडी असल्याचं सांगितलं.. आणि यामुळेच या प्रकरणात आता संशयाचे ढग जमा होऊ लागलेत