राज्यातील पवनचक्य मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलाय आणि संवाद साधला होता. सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने असे प्रकार होत आहेत असं त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय.