शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांना अजित पवार गटानं संपर्क केल्यानं सुप्रिया सुळे नाराज असल्याची माहिती सूत्र देतायत. सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन केल्याची माहिती आहे. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून शरद पवार गटाच्या खासदारांना संपर्क केला जात आहे अशी चर्चा आहे.