लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या एकीला सुरूंग लागायला सुरूवात झाली होती.विधानसभेच्या निवडणूकीत या सुरूंगाने सगळं धुळीत जाणार नाही याची काळजी नेत्यांनी घेतली खरी, पण त्यामुळे फक्त स्फोटाचे आवाज थांबले, भगदाडं पडायची ती पडलीच... आणि त्याचा पुरावा होता विधानसभेचा निकाल.. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर मात्र महाविकास आघाडी एकत्र राहण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येत चाललीय.. एकीकडे निवडून आलेले आमदार, खासदार पक्षबदलाच्या तयारीत असल्याच्या चर्चा होतायत.. तर दुसरीकडे पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व आघाडीतल्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रतिसादच देत नसल्याचे वाद आता चव्हाट्यावर यायला लागलेत... आणि सध्या या वादाच्या केंद्रस्थानी आहेत सुप्रिया सुळे. पाहुयात हा रिपोर्ट