सोलापुरात बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन सुरु आहे. चाळीस हजार क्विंटल कांदा लिलावानंतर सुद्धा पडूनच आहे. बाजार समिती दोन दिवस बंद राहणार आहे. या संपामुळे वीस कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली आहे.