फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात Shashikant Shinde यांचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षातील फुटीच्या चर्चेला छेद देण्याचा आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सांगलीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला.या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी महत्वाची घोषणाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी आता फोनवरुन हॅलोऐवजी जय शिवराय बोलायचं, असं म्हटलंय. याबरोबरच शिवरायांसोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असे आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

संबंधित व्हिडीओ