गौरी आगमनाने कोकणातील गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. माहेरवाशीण गौराईचे पारंपरिक पद्धतीने आणि वाजत-गाजत आगमन होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील महिला पाणवठ्यावरून गौरीच्या मुखवट्यासोबत खड्यांच्या गौरी आणण्याची अनोखी परंपरा जपताना दिसत आहेत. गौरी आगमनानिमित्त खास गाणी म्हटली जातात आणि या उत्साहात गणेशोत्सवाची रंगत आणखीनच वाढते.