राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी घटनादुरुस्ती हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये जर ७२% आरक्षण असू शकते, तर महाराष्ट्रातही घटनादुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रश्न केंद्र सरकारच्या पातळीवर सोडवला पाहिजे, असेही ते म्हणाले.