मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अडचणी येत असल्या तरी, हजारो मराठा समाज बांधव आपल्या मागण्यांसाठी ठाम आहेत. एनडीटीव्ही मराठीने आंदोलनाच्या ठिकाणचा आढावा घेतला असून, आंदोलकांचा उत्साह, त्यांच्या मागण्या आणि एकूणच आझाद मैदानातील परिस्थितीचा सविस्तर रिपोर्ट सादर करत आहे.