शिक्षण पद्धतीत मोठे बदल! २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील शाळांमध्ये तिसऱ्या इयत्तेपासूनच 'एआय' (Artificial Intelligence) हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. पुढील तांत्रिक वास्तवासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्या ऐच्छिक असलेला हा विषय आता प्राथमिक शिक्षणाच्या गाभ्यात आणला जात आहे