अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात तीन आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. ऋतिक , फुलसिंग, रेहान या तीनही आरोपींचा गोळीबारात सहभाग होता. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी मुंबईतून परराज्यात पळ काढला..मात्र कोटा रेल्वे स्टेशन येथून तिघांना अटक करण्यात आली होती. आज तीनही आरोपींना किला कोर्टात हजर केलं होतं. यावेळी सरकारी वकिलांनी तपासासाठी 14 दिवसांची कोठडी मागितली. गोळीबाराचं कनेक्शन परराज्यात असल्यामुळे तपासासाठी वेळ हवा असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. तर आरोपींच्या वकिलांनी त्यांचे अशील निर्दोष असल्याचं सांगितलं.. आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत असा युक्तिवाद कऱण्यात आला.. यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत 10 दिवसांची कोठडी मागितलीय..कोर्टात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये काय युक्तिवाद झालाय.. पाहुयात..
The shooting incident involving Tiger Shroff | What arguments were presented in court by the public prosecutor and the defense lawyers?