Tiger Shroff Case| कुणालने राधा-बबिताला पैसे दिले-सूत्र; मुंबईत 4 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आरोपी थांबले

टायगर श्रॉफ प्रकरणाच्या तपासात आता आणखी महत्त्वाची माहिती समोर येतेय. राधा आणि बबिता या दोन्ही महिला आरोपींना शस्त्र मुंबईत आणण्यासाठी कुणालने पैसे दिल्याची सूत्रांची माहिती आहे. कामाच्या निमित्ताने मुंबईत फिरता येईल, असं आमिषही दोघींना दाखवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाइल फेकून दिल्याचा संशय असून, या मोबाइलमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम खंडणीविरोधी पथकाकडून सुरू आहे. आरोपींचे सीडीआर तपासून ते नेमके कुणाच्या संपर्कात होते, याचाही शोध घेतला जातोय. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून पुरावे आणि कागदपत्रांची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरण मुंबईत 4 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आरोपी थांबले. कुणालाही शंका येऊ नये यासाठी आरोपी सतत हॉटेल बदलायचे. अंधेरी आणि आजूबाजूच्या परिसरात आरोपी हॉटेलमध्ये थांबले

संबंधित व्हिडीओ