Global News| ट्रम्प यांचा नवा कायदा, भारताची चिंता वाढली; अमेरिकेच्या कायद्याचा फटका भारताला बसणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि इराणवरील निर्बंधांशी संबंधित विधेयकावर स्वाक्षरी करत त्याचं कायद्यात रूपांतर केलंय.. या कायद्यानुसार रशियावर कडक निर्बंध लागू करण्यात येणार असून रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या देशांवर मोठा शुल्क लावण्याची तरतूद आहे. या कायद्यामुळे रशियावरील निर्बंध, शुल्क आणि इतर दंडात्मक उपाय अधिक व्यापक करण्याचा तसेच इराणवरील विद्यमान निर्बंधांची मुदत वाढवण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळणार आहे. रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या भारत, चीनसह इतर देशांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा अधिकार हा कायदा ट्रम्प यांना देतो.

संबंधित व्हिडीओ