नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात दोन दिवसांत दोन धक्कादायक गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही घटनांमध्ये अपहरण आणि हत्येचा प्रयत्न करण्यात आला असून, विवाहबाह्य संबंधांमुळे हे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणातील संशयितांना अटक केली असून, यात दोन विधी संघर्षित बालकांचाही समावेश आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर शहरात भीतीचं वातावरण होतं, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केलं आहे.