भुजबळ आणि जरांगे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. जरांगेंनी विरोधकांना निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला होता, आता भुजबळांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना निवडणुकीत पाडा, असं थेट आवाहन भुजबळांनी केलं आहे. त्यामुळे भुजबळ आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनाही आव्हान देत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.