वाशिम शहरातील अकोला नाका ते काटा चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे काम मागील तीन ते चार महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे.विशेष म्हणजे, याच मार्गावर जिल्हा प्रशासनाची अनेक महत्त्वाची कार्यालये तसेच महाविद्यालय असल्याने दररोज मोठ्या संख्येने नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्धांची ये-जा सुरू असते. या रस्त्याहून आढावा घेत नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.
Washim | Risk of accidents on the Akola Naka–Kata Chowk route; motorists fear for their lives due to the excavated road.