Karnataka| ऊस उत्पादक शेतकरी, विविध शेतकरी संघटनां रस्त्यावर; राजू शेट्टी आंदोलनासाठी हुबळीत दाखल

कर्नाटकातील हुबळी येथे ऊस उत्पादक शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांनी मोठं आंदोलन छेडलं आहे. ऊसाला योग्य आणि हमीभाव मिळावा तसेच प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी हेही कोल्हापूरमधून हुबळी येथे दाखल झाले आहेत. शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थान आणि कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक राज्य रयत सेनेने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात आणि ऊसासाठी निश्चित व लाभदायक दर जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. Karnataka | Sugarcane farmers and various farmers' organizations take to the streets; Raju Shetti arrives in Hubballi for the protest.

संबंधित व्हिडीओ