बीड जिल्हा कारागृहात ज्या ठिकाणी तैनात केले होते त्या ठिकाणी दोन्ही कर्मचारी गैरहजर दिसून आले.. यामुळेच जिल्हा कारागृह अधीक्षकांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यानंतर मात्र दोन कर्मचाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नोकरीवर तैनात केल्या ठिकाणी या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आदेश डावलत दुसरीकडे फिरकत राहिले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांचा हलगर्जपणाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यानंतर आज या दोन्ही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.