भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी अल-निनोमुळे भीषण परिस्थिती उद्भवणार असल्याची भीती व्यक्त केलीय. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एशिया सोसायटीने आयोजित कार्यक्रमात जयशंकर बोलत होते. त्यांनी म्हटले की युद्धांमुळे इंधन आणि खतांची टंचाई निर्माण झाली आहे. खतांची टंचाई आणि अल-निनोमुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. याचा परिणाम जागतिक पातळीवर जाणवेल अशी भीती जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. या अन्नधान्य टंचाईचा सर्वात मोठा फटका गरीब व विकसनशील देशांना बसेल असं जयशंकर यांनी म्हटलंय.
Global News | S. Jaishankar expresses concern over dire situation likely to arise due to El Niño.