बीडच्या पालकमंत्रीपदी कोण? हा प्रश्न सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात वारंवार विचारला जातोय. बीडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडेंकडे देऊ नका अशी मागणीही वारंवार होतीये. मात्र आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री होणार नाहीत असं स्पष्ट केल आहे.