मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एका ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे. पुढील क्लिपमुळे फडणवीस आणि शिंदे यांना धक्का बसेल, असा दावा त्यांनी केला. तसेच पहिल्या ऑडिओ क्लिपबाबत अद्याप कोणतीही चौकशी किंवा विचारणा झालेली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. येडशी येथे जळीतकांडातील करंडे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी हे वक्तव्य केले.