दिवाळीनंतर परतीचा प्रवास, Pali-Khopoli मार्गावर वाहतूक कोंडी; 3 ते 5 किमी वाहनांच्या रांगा

दिवाळी सुट्टीनंतर कोकणातून मुंबई आणि नवी मुंबईकडे परतणाऱ्या पर्यटकांमुळे रायगड जिल्ह्यातील पाली-खोपोली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पाली फाटा परिसरात वाहनांच्या तीन ते पाच किलोमीटर लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. कोकणातून येणारी वाहने आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर जाणारी वाहतूक वाढल्याने हा मार्ग अक्षरशः ठप्प झाला असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

संबंधित व्हिडीओ