अमरावतीच्या राजकीय वर्तुळात भाजप नेत्या नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. "दोन बादल्या पाण्याचा अनुभव घेऊन काहीजण समुद्राची खोली मोजायला निघालेत," अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे. कालच किराणा वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी नाव न घेता राणा दाम्पत्यावर टीका केली होती. त्यानंतर नवनीत राणांच्या या व्हिडिओचा नेमका रोख कुणाकडे आहे, याबाबत विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.