मनसेचा कार्यक्रमाशी काही संबंध नाही, Malad मधील छटपूजेच्या आयोजनावरून MNS चे स्पष्टीकरण

मालाड विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून छटपूजेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा होती.. यावर मनसेनं स्पष्टीकरण दिलंय. छटपूजेच्या आयोजनाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मालाड परिसरात एका खासगी मंडळाकडून गेल्या २२ वर्षांपासून छटपूजेचे आयोजन केले जात आहे. यंदाही या मंडळाकडून छटपूजेची तयारी करण्यात आली असून, पूजेच्या जाहिरात फलकावर स्थानिक मनसे नगरसेविकेचा फोटो लावण्यात आलाय., आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेविकेचा फोटो बॅनरवर असल्याने या आयोजनाचे श्रेय मनसेला दिले जात असल्याची चर्चा सुरू झाली.

संबंधित व्हिडीओ