उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या विभागाच्या कामकाजाबद्दल नाईकांनी आपल्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. मंत्री म्हणून आपल्या विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला असून, त्याची माहिती केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनाच देण्यास आपण बांधील असल्याचे सामंत यांनी सांगितलंय. पालघरच्या भादवे-उसरणी या प्रस्तावित MIDCप्रकल्पावरून पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्री उदय सामंत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावर सामंतांनी उत्तर दिलंय.